
राजापूर तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू, जिल्हा पोलीस अधीक्षकानी दिली घटनास्थळी भेट

राजापूर तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा करण्याचे स्पष्ट निर्देश तपास यंत्रणेला दिले आहेत.

सदर ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकारी लांजा उप विभाग श्री सुरेश कदम, पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक श्री अमित यादव राजापूर पोलीस ठाणे हे उपस्थित होते.

मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपाटण-टक्केवाडी येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.




