
“मनसे”च्या शृंगारतळी शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ता वेदांत देवळेकर यांची नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शृंगारतळी शहराध्यक्षपदी युवा कार्यकर्ता वेदांत देवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या प्रयत्नातून तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी नूतन शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर यांनी सांगितले की, “मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराला प्रेरित होऊन मी लहानपणापासूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत आहे. शृंगारतळीसारख्या शहराची जबाबदारी माझ्यावर आली असून ही जबाबदारी मनसेचे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असेल. या शहरातील युवकांना मनसे पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचा सदोदित प्रयत्न करेन. मनसे पक्ष कसा वाढेल याकडे माझा जास्त भर असून मनसेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्नशील असेल.”
निवड झाल्यानंतर अनेकांनी वेदांत देवळेकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.




