परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढवली


परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. दसरा, कोजागिरी होऊनही पावसाचा जोर कमी होत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पाऊस थांबण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पावसाने भातकापणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण केला आहे.
सध्या भातकापणीचा काळ असताना पावसाच्या सततच्या सरींमुळे पिके आडवी
झाली आहेत. विशेषतः सखल आणि पाणथळीच्या जमिनीत तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. येथे आडवी झालेली भातपिके पाण्यामुळे सडू लागली असून नासाडी वाढली आहे. साचलेल्या पाण्यामुळे आणि दमट हवामानामुळे पिकांवर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे आर्थीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button