
दूषित खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू झाल्याने महाराष्ट्रातील किरकोळ केमिस्टना केले जातेय लक्ष्य
मध्यप्रदेश व राजस्थानमधील २० मुलांचा दूषित खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू झाल्याने महाराष्ट्रातील किरकोळ केमिस्टना लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्र एफडीएने घेतलेल्या कठोर व अव्यवहार्य कारवाईबद्दल एमआयओसीडी व एमएससीडीए यांनी खेद व्यक्त केला आहे.
एमआयओसीडी व एमएससीडीए या दोन्ही संघटनांकडून दूषित खोक्याच्या सिरपमुळे मृत्यू पावलेल्या २० मुलांबाबत चिंता व तीव्र वेदना व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना औद्योगिक दर्जाच्या ग्लिसरीनमध्ये असलेल्या डाय-इथिलीन ग्लायकॉल या विषारी रसायनामुळे झाल्याचे समजते. ह रसायन सिरपमध्ये गोडवा आणण्यासाठी वापरल्या जाणार्या इक्सिपियंट म्हणून वापरले गेले होते. संघटनेचे नेते अनिल नावंदर यांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, ही पहिलीच घटना नाही. अशा प्रकारच्या घटना १९३७ पासून अमेरिकेत व अलिकडे गॅम्बियामध्ये घडल्या आहेत. सर्वत्र एकच कारण आढळले आहे. औषध उत्पादक कंपन्यांनी औद्योगिक दर्जाचे एक्सिपियंटस वापरले. जगभरात नियामक दृष्टीकोन बदलत आहे व उत्पादनाची गुणवत्ता उत्पादनाच्या विकास टप्प्यातच अंगभूत असावी, हा सिद्धांत महत्वाचा झाला आहे. गुड मॅन्युफॅक्चरींग प्रेक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रेक्टिसेस आणि क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमचे पालन करणे आवश्यक आहे. औषधाच्या गुणवत्तेची पूर्ण जबाबदारी उत्पादकावर असते. नियमकांनी खात्री करावी की, औषधात वापरले जाणारे सर्व घटक फार्माकोपियाच्या दर्जाचे असावेत. काही लहान उत्पादक स्वस्त औद्योगिक दर्जाचे घटक वापरतात. ज्यामुळे चाचणीपासून सुटून अशा दुर्दैवी घटना घडतील.www.konkantoday.com




