दापोली शहरात ’दापोली फंड’ नावाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर प्रकार उघड


दापोली शहरात ’दापोली फंड’ या नावाने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सार्वजनिक महामंडळातील काही कर्मचारी आणि महिला कर्मचार्‍यांचा थेट सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
या विरोधात दापोली येथील सुज्ञ नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी दापोली पोलिसांनी काही कर्मचायांची चौकशी सुरू केल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. दरम्यान एका सार्वजनिक महामंडळाच्या दापोली फंडाची गाडी पोलीस चौकशीच्या फेर्‍यात अडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. शहरातील काही कर्मचार्‍यांनी ’दापोली फंड’ या नावाने अनेक व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून त्यातून आर्थिक व्यवहार सुरू केले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये ५० ते ६० सभासदांचा समावेश असून, प्रत्येक जण दर महिन्याला १००० ते ५००० रुपये रोकड स्वरुपात जमा करतो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button