
डॉ. विवेक नातू यांचे विंचू दंशावरील प्रतिविषावर संशोधन
विंचू दशावरील प्रतिविषावर संशोधन करणारे डॉ. विवेक नातू यांचा रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. स्व. डॉ. तात्यासाहेब नातू यांचे विंचू दंशासाठी प्रतिविष विकसित करण्याचे स्वप्न जयश्री हॉस्पिटल घोणसरचे डॉ. विवेक नातू यांनी १६ वर्षे संशोधन करून घोड्याचे रक्त वापरून विंचू दंश प्रतिविष सिरम प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम तयार करण्यात यश मिळाले. कोकणात विंचू दंश भरपूर होतात. समाजाला उपयोगी विंचू दंश प्रतिविष सिरम तयार करून, घोणसरे येथे १० ऑक्टो. पासून मोफत सुविधा सुरू केल्याबद्दल रामपूर मार्गताम्हाणे पत्रकार संघाच्यावतीने विजयश्री हॉस्पिटल घोणसरे येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी डॉ. विवेक नातू व सौ. निला नातू यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून, अभिनंदन केले. या वेळी डॉ. जगदीश पाटेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com




