
ट्रक चोरला, पण लोकेशनने घात केला, आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला
ओव्हरलोड जांभ्या दगडाने भरलेला ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतल्यानंतर तो ट्रक चोरून नेणार्या आरोपीला देवरूख पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक करून अटक केली आहे. शरणबसप्पा तळवार (कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी घडली होती.
दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता हा ट्रक (केए ३२-डी- ६१३४) लांजा ते दाभोळ रस्त्यावर सुकमवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उभा केला होता. ओव्हरलोड वाहतुकीबद्दल महसूल विभागाने या ट्रकवर कारवाई करून, पुढील कार्यवाहीसाठी तो देवरूख येथील तहसिलदार कार्यालयात जमा करण्यासाठी ताब्यात घेतला होता. त्यानुसार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता हा ट्रक शिवाजी चौक येथे वडापच्या पाराजवळ रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला होता. आरोपी शरणबसप्पा तळवार याने याच ठिकाणाहून कार्यालयाच्या ताब्यात असलेल्या आपल्या मालकीचा ट्रक अनधिकृतरित्या चालू करून कोणत्याही परवानगिशिवाय चोरू नेला होता.www.konkantoday.com




