
“जीजीपीएस”च्या पूर्वप्राथमिक विभागातर्फे नवरात्रीनिमित्त पालकांसाठी रांगोळी स्पर्धा
रत्नागिरी : येथील जीजीपीएसच्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागाने नवरात्रीनिमित्त पालकांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती.
‘नवरात्री’ हा विषय पालकांसाठी रांगोळीकरता दिला गेला होता. त्यामध्ये पालकांनी खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्यांच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचे दर्शन झाले. भर पावसातही पालक अगदी उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले.
या स्पर्धेसाठी सौ. वृषाली भूषण दळी आणि सौ. शमिका पारकर या परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. खरंतर सर्वच रांगोळ्या बक्षीस प्राप्त होत्या, इतक्या सुंदर रांगोळ्या पालकांनी काढल्या होत्या.
या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ. अपूर्वा मुरकर आणि प्री प्रायमरी विभागाच्या सौ. शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.




