जिल्ह्यात यलो अलर्ट पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन


रत्नागिरी, दि. २७ ) प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दि. 27/10/2025 ते 29/10/2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवा याह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीचे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विदयुत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून
ठेवावीत.
दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.
विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय
घ्यावा.
विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका
विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा
शेडमध्ये आसरा घेऊ नका.
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP डाऊनलोड करुन घ्यावे.
पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण
करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा
घ्यावा.
कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
नियंत्रण कक्ष
1
जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष,
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
02352-226248 /222233
व्हाटसअप 7057222233
2
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष
3
| जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी
02352 222222
पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112
02352 222363
Scanned with OKEN Scann
महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष
तहसिल कार्यालय रत्नागिरी
7875765018
02352-223127
6
| तहसिल कार्यालय लांजा
02351 – 230024
7
| तहसिल कार्यालय राजापूर
02353-222027
8
तहसिल कार्यालय संगमेश्वर
02354-260024
9
तहसिल कार्यालय चिपळूण
02355-252044/9673252044
110
तहसिल कार्यालय खेड
02356-263031
11 तहसिल कार्यालय दापोली
02358-282036
12
तहसिल कार्यालय गुहागर
02359-240237
02350-225236
13 तहसिल कार्यालय मंडणगड

  • हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरुन घ्या.
    कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री
    अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस
    हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.
    हवामान विभागाकडून दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची
    काळजी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button