जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत जीजीपीएस शाळा अजिंक्य

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या शालेय क्रिडा स्पर्धांमधील क्रिकेट खेळात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस शाळेच्या १४ वर्षांखालील संघाने बाजी मारत जिल्हास्तरीय स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी विरुद्ध दापोली असा अंतिम सामना रंगला. प्रथम फलंदाजी करत दापोली संघाने ५ षटकांत ३५ धावा केल्या आणि विजयासाठी ३६ धावांचे आव्हान रत्नागिरी जीजीपीएस टीमला दिले.
जीजीपीएस संघाने दोन विकेट्सच्या बदल्यात हे आव्हान लिलया पार केले. या सामन्यात जीजीपीएसच्या रुद्र पांढरे आणि देवांग गुरव यांनी चमकदार कामगिरी केली. या संघाला प्रशिक्षक श्री. कदम यांचे मार्गदर्शन लाभले. जीजीपीएस संघाने विभागासाठी वाटचाल केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button