
चिपळूण-कराड मार्गावरील अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू
चिपळूण-कराड मार्गावरील सती येथे काही दिवसांपूर्वी दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झालेला वेहेळेतील कबड्डीपटू सागर विजय गमरे (२६) याचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर वेहेळे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सागर हा वेहेळे येथून दुचाकीने चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने येत होता. तो सती येथे आला असता त्याची व अन्य एक दुचाकी एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. यात सागर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासांठी कराड येथे नेण्यात आले. त्याच ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. अनेक वषर्षांपासून सागर भीम संघर्ष वेहेळे या स्थानिक संघातून कबड्डी खेळत होता. त्याच्या सर्वात्तोम खेळामुळे अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या संघाने विजय प्राप्त केला आहे.
सागरच्या आई-वडिलांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले. अपघातातील जखमी झालेल्या सागरची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वेहेळे गाव परिसरासह कबड्डी वर्तुळात शोककळा पसरली आहे.www.konkantoday.com




