गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत मोठी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन


दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत मोठी खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती तसेच गणपतीपुळे पोलिस यंत्रणेने केले आहे.जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनार्‍यावर कुठलाही धोक उद्भवू नये, या उद्देशाने पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत सुरक्षितता बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, समुद्रातील भरती ओहोटीचा वेग, मोठ्या लाटा आणि प्रवाह या विषयीची माहिती स्थानिक व्यावसायिक आणि जीव रक्षकांकडून घ्यावी तसेच जीव रक्षक आणि वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे करावे, समुद्रकिनारी लावलेले लाल झेंडे आणि जीव रक्षकांचे इशारे याबाबत माहिती घ्यावी तसेच स्वतःची आणि कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ सुरक्षित मर्यादेतच समुद्रस्नानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button