कळंबस्ते फाटा ते धामणंद रोडवरील खड्ड्यांवर माजी सभापती शौकतभाई मुकादम यानी केली फटाके वाजवून दिवाळी साजरी;

*चिपळूण शहरातील कळंबस्ते फाटा ते धामणंद रोडवरील दुर्दशाग्रस्त रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, स्थानिक नागरिकांनी याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदरचा रस्ता खेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून, अनेक वेळा दुरुस्तीची मागणी केली असतानाही तो दुर्लक्ष केला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी निर्णय घेतला की, यंदाची दिवाळी खड्ड्यात फटाके वाजवून साजरी केली जाईल, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर आवाज पोहोचेल. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर यानंतरही खड्डे ताबडतोब भरले नाहीत, तर पुढील फटाके संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वाजवले जातील.

आज सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कळंबस्ते पेठ येथे या रस्त्यावरील खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी कळंबस्ते सरपंच विकास गमरे, उपसरपंच गजानन महाडीक, ग्रामपंचायत सदस्य विवेक महाडीक, शिरीषदादा शिंदेसाहेब, दिपक शिगवण, पांडुरंग पिलावरे, ह.भ.प. चव्हाण बुवा, हळदे, अमेय महाडीक, सौरभ महाडीक, विकास जोरवेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button