एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक, मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक मारणार.


एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले असून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाने पुढील आठवड्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
पर्ससीन नेट मासेमारीला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काही दिवस नैसर्गिक अडचणींमुळे वाया गेले असले तरी, पर्ससीन नौकांना बांगडा व म्हाकुळ मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पर्ससीन र्ससीन नौकांना मासळी मिळत असतानाही, काही नौकांनी बेकायदेशीररित्या एलईडी प्रकाशात मासेमारी सुरू केली आहे. एलईडी दिव्यांच्या तीव्र प्रकाशाकडे आकर्षित होऊन मासळी मोठ्या प्रमाणात जाळ्यात अडकते. यामुळे पारंपरिक मच्छिमारांचे नुकसान होत आहे. एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणार्‍या लहान नौकांना मिळणार्‍या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. अवैध मासेमारी नजरेत येऊ नये म्हणून आता रात्रीबरोबरच दिवसाही मासेमारी केली जात आहे. मासेमारी करून या नौका संध्याकाळी राजिवडा व मिरकरवाडा जेटीवर मासळी उतरवतात, हा प्रकार पारंपरिक मच्छिमारांच्या नजरेस आला आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या या बेकायदेशीर मासेमारीवर तोडगा काढण्यासाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाची तालुका स्तरावर नुकतीच बैठक झाली. यावेळी संघाचे अध्यक्ष रणजित भाटकर यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढील आठवडयात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली जाईल अधिकारी या अवैय मासेमारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, भाटकर यांनी अधिकार्‍यांना समुद्रात नेऊन ही अवैध मासेमारी कशी चालते हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची तयारी दर्शवली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button