
आता रत्नागिरी जिल्ह्यातील खड्ड्यांवर कोल्डमिक्सचा नवा पर्याय
पावसाळ्यात जवळपास सर्रास चिपळूण शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जीवघेणे खड्डे दिसून येत आहेत. डांबरी रस्त्याची त्यामुळे अक्षरशः चाळण झघली आहे. यासंदर्भात स्थानिकांकडून ओरड सुरू असून वारंवार अपघाताचे प्रकारही घडत असल्याने त्याची गंभीर दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली आहे. खड्डे बुजविण्यासाठी आता कोल्ड मिक्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी नाशिक येथील गोल्डन ड्राय कंपनीने शहरातील काही भागात चाचणी घेतली. आठ दिवसात त्याचा परिणाम स्पष्ट होवून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.www.konkantoday.com



