अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थितीमुळे कोकणातील मासेमारीला फटका


काही दिवसापूर्वी अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. आता दक्षिणेकडून उत्तरेकडे उलट्या दिशेने वाहणार्‍या वार्‍यांमुळे कोकण किनारपट्टीवरील मासेमारीवर गंभीर परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १२ हजारांहून अधिक मच्छीमार समुदायाच्या उत्पन्नावर मोठे संकट कोसळले आहे. दरवर्षी, याकाळात म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उत्तरेकडून वारे वाहू लागतात आणि त्यामुळे समुद्र शांत होऊन मासेमारीस पोषक वातावरण तयार होते. परंतु यंदा हवामानातील  ावर उतरत. मात्र सध्या हे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मत्स्य बाजारातील दर वाढले आहेत. याचा खवय्यांवर व स्थानिक हॉटेल व्यवसायावरही परिणाम दिसून येत आहे.. बदलामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे उलट्या दिशेने वारे वाहत आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले असून मासे खोल समुद्रात सरकले आहेत. किनार्‍यालगत मासे मिळणे दुरापास्त झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button