
अधिकार्यांकडून कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही -खासदार सुनील तटकरे
मंडणगड तालुक्याला वाटेवर अग्रेसर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणातील सर्व अधिकार्यांनी तालुक्याच्या पायाभूत सुविधा प्रश्न सोडविण्यासाठी अग्रक्रम द्या. यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा व कामचुकारपणा खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी अधिकार्यांना दिला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर अधिकार्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेताना तालुक्यात १०२ जलजीवन मिशन योजना आहेत. एकूण ४४ कोटींचा आराखडा असून त्यातील २५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. बाणकोट, आंबवली, जावळे, कुडुक खुर्द, मंडणगड शहर नगरपंचायत पाणी योजना या विषयी गंभीर समस्या उपस्थित केल्या. या समस्या मार्गी लावण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी यावेळी दिल्या.
www.konkantoday.com




