सेवा पंधरवडा अभियानांतर्गत कातकरी समाजासदाखले वितरणासाठी मोहीम राबवा   – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह


रत्नागिरी, दि. 29 ):- सेवा पंधरवडा कालावधीत जिल्ह्यातील कातकरी समाजासाठी मोहीम स्वरुपात युध्दपातळीवर तालुकानिहाय आधार नोंदणी, जातीचे दाखले, रहिवास दाखले, निवडणूक ओळखपत्र व रेशनकार्ड वितरण करावे, असे  निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यांनी दिले
            “छत्रपती शिवाजी महाराज” महाराजस्व अभियानातंर्गत 17 सप्टेंबर, 2025 ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये दापोली तालुक्यामध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. सदर अभियानातंर्गत तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम  28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येत असून दापोली तालुक्यातील शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी आवश्यक असलेले दाखले (अधिवास दाखला/जातीचा दाखला) वाटप करणे हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
            त्यानुसार उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली तालुक्यात 24 सप्टेंबर रोजी आदिवासी समाज मंदिर, शिरसेश्वर वाडी व 25 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय कुडावळे येथे आदिवासी/कातकरी समाजासाठी विविध सेवा विषयक विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात आधारकार्ड नोंदणी व अपडेशन- 60, पुरवठा विषयक सेवा- 16, विविध दाखले अर्ज प्राप्त 57, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी- 23 याप्रकारे अर्ज स्वीकारण्यात आले.
            शिबीरास आदिवासी बांधवामार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते. तहसिलदार अर्चना बोंबे, मंडळ अधिकारी सयाजी पवार, किरण आंभोरे व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. शिबीरामध्ये तहसिलदारांनी आदिवासी समाजास मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button