
वादळसदृश स्थितीमुळे गुजरात रत्नागिरीसह शेकडो नौका देवगड बंदराच्या आश्रयास
समुद्रातील वादळसदृश स्थितीमुळे गुजरात, रत्नागिरीसह मालवण, वेंगुर्ल्यासह शेकडो नौका देवगड बंदराच्या आश्रयास आल्या आहेत. यात स्थानिक नौकांचाही समावेश आहे. बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये अशा सुचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळपासूनच मासेमारीसाठी गेलेल्या नौकांनी सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने मिळालेल्या हवामान पूर्व सूचनेच्या अनुषंगाने राज्याच्या किनार्यालगत असलेल्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याबाबत इशारा दिला आहे.
www.konkantoday.com




