रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन’महाविस्तार एआय ॲप’ शेतकऱ्यांचा सखा


रत्नागिरी, दि. 29 ) : कृषी विभागाने विकसित केलेले “महा विस्तार एआय अॕप” नुकतेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॕपमुळे शेतीसंबंधी सर्व प्रकारची महत्‍त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. गुगल प्ले स्टोअर जाऊन आजच महाविस्तार एआय अॕप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा! असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai यासाठीची लिंक आहे.
शेतक-यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने हे अॕप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॕप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.
महाविस्तार एआय अॕपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो. रिअल-टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळु शकतील. अॕपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अॕपमधील एआय तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात.
महाविस्तार एआय ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाइलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो, चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button