रत्नागिरी तालुका अंगणवाडी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचीवार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


रत्नागिरी तालुका अंगणवाडी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी या संस्थे ची सन 2024/2025 ची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 27/9/25 रोजी साळवी स्टॉप माध्यमिक पतपेढी रत्नागिरी येथे संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. संगीता दिपक आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली हि पतसंस्था माजी प्रकल्प अधिकारी मा. जयंत पांडुरंग जाधव यांनी 23/09/2009 साली स्थापन केली एक लहान रोप लावलं आणि त्या रोपाच एक मोठा वटवृक्ष होऊन आज तळागळात ग्रामीण भागात अल्पशा मानधनातून बालकांचे भविष्य घडवणाऱ्या तसेच विविध शासकीय योजना ग्रामीण भागात राबविणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस च्या मानधनातून बचत करून हि पतसंस्था आज प्रत्येक सभासदांना कर्ज वितरित करून” अ ” श्रेणी मध्ये आहे ते केवळ संचालक मंडळ आणि आमच्या पतसंस्थेच्या 2009 पासुन सचिव मन्हून काम करणाऱ्या आमच्या सौ.वर्षा अनिल जाधव मॅडम यांच्या मुळे आज हि पतसंस्था माझ्या अंगणवाडी सेविकां मदतनीस ला बचतीबरोबर कर्ज वितरित करून लाभांश मिळवून देतेय आणि त्त्यांच्या हक्काची बँक झालीय जाधव सरांनी लावलेल्या या रोपाच वटवृक्ष झालं या प्रत्येक बिट मध्ये कामकाज करणारी एक अंगणवाडी सेविका हि या संचालक मंडळामध्ये आज पुर्ण बिट चे काम बघतेय.

आजची सभा संचालक मंडळाचे पदाधिकारी अध्यक्षा मा. संगीता दिपक आंबेरकर कोतवडे 2 सौ. नफिसा अ. रहेमान नाखवा उपाध्यक्षा कोतवडे 1,संजोक्ती सुरेश शिंदे पावस 2 सौ. तारका वामन पारकर वाटद सौ.धनश्री धनंजय बाचीम मालगुंड 1,सौ अंजली प्रफुल्ल पारकर मालगुंड 2,सौ. विजया व्यकटेश मुकादम जाकादेवी 1,सौ. संजना संतोष सुवरे जाकादेवी 2,शुभदा भिकाजी नाटेकर चांदेराई 1,सौ प्रिती रोहिदास गावडे चांदेराई 2,सौ.साक्षी विजय गावडे खानू, सौ. आकांक्षा प्रशांत जाधव हातखंबा 1,श्रीमती. जयश्री उदय लिमये हातखंबा 2,सौ. श्रद्धा शशांक गुरव पावस 1, सौ वर्षा अनिल जाधव सचिव सौ. श्रुती संतोष पांचाळ क्लार्क तसेच सर्वं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उपस्थित संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button