
पैशासाठी चोरटयानी देवालाही सोडत नाहीत, रत्नागिरीतल्या प्रसिद्ध श्रीराम मंदिरात चोरट्याने सीतामाईच्या गळ्यातील दागिना लांबविला, पहा व्हिडिओ
पैसा मिळवण्यासाठी हल्ली माणूस कोणत्याही पातळीवर उतरत आहे संकटाच्या काळात आधार असलेल्या देवालाही आता चोरट्यानी लक्ष बनविले आहे.
रत्नागिरी शहरातील
भर बाजारपेठेत गजबजलेल्या अशा प्रसिद्ध श्री राममंदिरात एका भुरट्या चोरट्याने प्रवेश करून सीताबाई च्या गळ्यातील दागिना लंपास केल्याने खळबळ उडाली आहे मात्र हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे लाल रंगाचा शर्ट घातलेला हा चोरटा श्रीराम मंदिरात दाखल झाला श्रीराम व सीतामाईच्या मूर्ती समोर उभा राहून त्याने नमस्कार करण्याचे नाटक केले आणि इकडे तिकडे बघून सीतामाईच्या गळ्यातील दागिना पटकन ओढून तो तेथून लंपास झाला मात्र त्याने जाताना देवळातली घंटी ही वाजवली त्यामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांना कोणी भक्त आला असावा असे वाटले असल्याने ही चोरीची घटना उघड झाली नाही मात्र देवळात बसवलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे
या चोरट्याने श्रीराम मंदिरातील सीता माईच्या गळ्यातील दागिना चोरताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान चोरी करणारा चोर हा बाहेरील गावातील असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे




