
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चिपळूण व खेड तालुक्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा
रत्नागिरी, दि. 29 ):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीर माता/वीर पिता/ यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचा चिपळूण व खेड तालुक्यामध्ये माहे ऑक्टोबर 2025 चा दौरा आयोजित करण्यात आला आहेत.
चिपळूण तालुक्यामध्ये 7 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर व 28 ऑक्टोबर 2025 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे व खेड तालुक्यामध्ये 6 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर व 27 ऑक्टोबर रोजी दौरा होणार आहे. अधिक माहितीसाठी अशा. कल्याण संघटक सुनिल कदम मो. क्र. 9413541588, कल्याण संघटक राहुल काटे मो. क्र. 8210252830, कल्याण संघटक अनिल मोरबाळे संपर्क क्रमांक 7218498627 यांना संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.




