
महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली नवदुर्गादेवी दर्शनासाठी आबलोली येथून पं. स. पडवे गणातील तीन बस गाड्या रवाना
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे पंचायत समिती गणातील तवसाळ, कुडली, नवानगर गावातील नारीशक्तींना नवदुर्गा देवी शक्तींचे दर्शन व्हावे यासाठी जि.प.चे माजी सदस्य महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना पक्षाचे गुहागर तालुका विधानसभा क्षेत्र समन्वयक विपुल कदम यांच्या सौजन्याने पंचायत समिती पडवे गणातील महिला नवदुर्गा शक्तींच्या दर्शनासाठी आबलोली येथून तीन बस गाड्यांनी रवाना झाल्या.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे श्री विठ्ठल रखुमाई नवतरुण मंडळ यांच्या दुर्गा देवीचे दर्शन घेऊन, देवीला नारळ अर्पण करून, देवीला गाऱ्हाणं घालून तीन बस गाड्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या आहेत. यावेळी पंचायत समिती गणातील तवसाळ, कुडली, नवानगर येथील महिलांनी आबलोली येथील दुर्गादेवी समोर जाखडी नृत्य सादर करून आपल्या अंगातील कलागुणांचे दर्शन घडवले.
नवदुर्गा देवी शक्तींच्या दर्शनासाठी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील पद्मावती देवी, गोवळकोट येथील करंजेश्वरी देवी, परशुराम येथील रेणुका माता देवी, वालोपे येथील झोलाई देवी, चिपळूणातील जुना भैरी, विध्यंवाशिनी देवी मंदिर, खेर्डी येथील सुंकाई देवी मंदिर, टेरव येथील भवानी माता, तुरबंव येथील शारदा देवी मंदिर दर्शन आदी नवदुर्गा देवींच्या दर्शनासाठी तीन गाड्या रवाना होण्यापूर्वी जि. प. चे माजी सदस्य महेश नाटेकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून या गाड्या पुढील प्रवासासाठी सोडण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख संदेश काजरोळकर, प्रदीप सुर्वे, विभाग प्रमुख विशाल गोताड, विजय वैद्य, अरुण दिंडे, मासू गावचे शाखाप्रमुख शशिकांत भोजने, तवसाळचे उपसरपंच प्रसाद सुर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




