
बिबट्याच्या हल्ल्यापासुन खबरदारी म्हणुन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यानी रस्त्यावरील झाडी तोडत केली स्वच्छता मोहिम
राजापूर : तालुक्यातील पेंडखळे येथे बिबट्याचे दुचाकी व पादचार्यांवर काही दिवसापूर्वी झालेले हल्ले भर वस्तीत रस्त्यांवर बिबट्यांचा होणारा वावर
लक्षात घेता खबरदारी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील झाडी तोडून रस्ता मोकळा केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पादचारी, दुचाकी स्वार यांना दिलासा मिळाला आहे.गुरव यांच्या अशाच कार्यामुळे त्यांची जनतेचा कैवारी म्हणून तालुक्यात ओळख आहे.
गेले काही दिवसांपासून पेंडखळे परिसरात दोन बिबट्या आणि तिची दोन पिल्लं भर दिवसा रस्त्यांवर फिरत आहेत. अशावेळी तेथील शालेय विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवर येजा करावी लागत आहे. वाढलेल्या झाडीमुळे बिबटया असल्यास निदर्शनास येत नाही. त्यामुळे ही झाडी तोडल्याने रस्ता मोकळा झाला असून दूरवर मोकळे दिसत असल्याने ग्रामस्थांना लांबूनही बिबटया असल्यास निदर्शनास येणार आहे.
यावेळी भू पंचकोशीचे सर्व कार्यकर्ते व गावातील मंडळी उपस्थित होते. यामध्ये भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोहन घुमे, मंदार सप्रे, कोतापुर गावचे बाळ घाटे, अक्षय पाध्ये, पांडुरंग सुर्वे, सुनील खानविलकर, संजू जोगळे, भरत गराटे, तसेच संदेश विचारे दत्ताराम पुजारी, संदीप तेरवणकर यांनी सुद्धा श्रमदान करून मदत केली. ग्रामस्थांमध्ये असलेली बिबट्याची दहशत कमी व्हावी म्हणून गुरव यांनी रस्त्यावरील झाडी तोडून केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांतून धन्यवाद दिले जात आहेत.




