
जि. प. माजी सभापती ऋतुजा खांडेकर यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घेतली भेट
रत्नागिरी | गुहागर तालुक्यातील उबाठा गटाच्या जिल्हा परिषद माजी सभापती तथा महिला व बालकल्याण विभागात प्रभावी कामगिरी करणाऱ्या श्रीमती ऋतुजा खांडेकर यांनी आज रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान श्रीमती खांडेकर यांनी गुहागर मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.




