
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथे दोन गोव्या रेड्यांचा झुंजीत मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील मोरेवाडी परिसरात आवळीचा माळ या मोकळ्या टेकडीवर दोन गवारे यांचा झुंजित मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ताकदवान गवे रेडे एकमेकांशी झुंज देत होते दोन्ही गव्यांची शिंगे एकमेकांत घट्ट अडकली अखेरीस झुंजार लढतीदरम्यान श्वास गुदमरल्याने दोन्ही गव्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे
रविवारी पहाटे या घटनेची चाहूल ग्रामस्थांना लागली. सकाळी रोजच्या प्रमाणे जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना आवळीच्या माळावर दोन प्रचंड गवे निश्चल अवस्थेत पडलेले दिसले.ग्रामस्थांनी तत्काळ पोलीस पाटलांना यासंबंधीची माहिती दिली तातडीने वनविभाग आणि पोलिस यांना कळविले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात ही नैसर्गिक घटना असल्याचे स्पष्ट झाले




