भारताने पाकड्यांना शेवटी क्रिकेटमध्ये देखील हरवलेच, तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक


भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. पहिल्या दोन सामन्यांत सहज पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाने फायनलमध्ये चांगली टक्कर दिली, परंतु भारतासमोर ते टिकले नाही.आशिया चषकाच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर आले आणि त्यात सूर्यकुमार यादवच्या संघाने बाजी मारली. ४ विकेट्स घेणारा कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या विजयाचे नायक ठरले. भारताने सलग सात सामने जिंकून आशिया चषकात अपराजित मालिका कायम राखली.
साहिबदाजा फरहान ( ५८) आणि फखर जमान ( ४६) यांनी ज्या प्रकारे पाकिस्तानला सुरुवात करून दिली होती, ते पाहता १८० च्या वर धावा सहज उभ्या राहतील असे वाटले. पण, हे दोघंही वरुण चक्रवर्थीच्या फिरकीसमोर माघारी परतले अन् पाकिस्तानचा डाव २ बाद ११३ धावांवरून १४६ धावांवर गुंडाळला गेला. कुलदीप यादवने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

याउलट भारताची सुरुवात निराशाजन राहिली आणि आघाडीचे तीन फलंदाज २० धावांत तंबूत परतले. फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा ( ५ ) स्वस्तात माघारी परतला. त्याने आशिया चषकाच्या या पर्वात सर्वाधिक ३१४ धावा केल्या आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव ( ८) व शुभमन गिल ( १२) हे माघारी परतल्यानं भारतीय संघ अडचणीत सापडला.

अशा वेळी संजू सॅमसनच्या संयमी आणि तिलक वर्माच्या आक्रमक फटकेबाजीने भारताला सावरले. संजूला १३ धावांवर दिलेले जीवदान पाकिस्तानला महागात पडले. संजू व तिलक यांनी ४३ चेंडूंत ५० धावांची महत्त्वाची भागीदारी पूर्ण केली. पण, अब्रार अहमदने योग्य फिरकीवर संजूला मोठा फटका मारण्यास भाग पाडले अन् साहिबजादा फरहानने झेल टिपला. संजू २४ धावांवर बाद होताच तिलकसह ५७ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

४२ चेंडूंत ६९ धावा हव्या असताना शिवम दुबे मैदानावर आला आणि त्याने तिलकसरह पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. तिलक रन आऊट होता होता वाचला अन्यथा सामना एकतर्फा झाला असता. या दोघांनी ही मॅच ३० चेंडूंत ४७ धावा अशी जवळ आणली. तिलकने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पण, पाकिस्तानी हार मानण्यास तयार नव्हते आणि त्यांनी ३ षटकांत ३० धावा अशी मॅच चुरशीची ठेवली होती.
रौफने १५ व्या व १७ व्या षटकात अनुक्रमे १७ व १३ धावा दिल्या. भारताला दोन षटकांत आता १७ धावाच हव्या होत्या. १९ व्या षटकात फहीम अश्रफ गोलंदाजीला आला आणि दोन विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या पायात क्रॅम्प आल्याचे दिसले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पाकिस्तान्यांकडून मुद्दाम वेळकाढूपणा सुरू होता आणि भारताने यावर आक्षेप घेतला. फहिमने पहिल्या तीन चेंडूवर तीन धावा दिल्या, परंतु शिवमने चौथ्या चेंडूवर ऑफ साईडला येऊन लेग साईडला चौकार खेचला. पण, शेवटच्या चेंडूवर शिवमने समोरच्या दिशेने चेंडू टोलवला आणि शाहीनने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला.

शिवम २२ चेंडूंत ३३ धावांवर बाद झाला आणि तिलकसह त्याची ६० धावांची भागीदारी संपुष्टात आली. भारताला सहा चेंडूंत १० धावा हव्या होत्या. वेळ वाया घालवल्यामुळे पाकिस्तानचा एक अतिरिक्त खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या आत उभा करावा लागला. तिलकने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानंतर दुसरा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावला. आशिया चषक २०२५ मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या रिंकू सिंगने विजयी धाव घेतली आणि भारताला आशिया चषक जिंकून दिला. तिलकने ५३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६९ धावांची मॅच विनिंग खेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button