9/11 च्या हल्ल्यात जखमींवर उपचार करणारे डॉ. नील आनंद यांना 14 वर्षांचा तुरुंगवास!

अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जखमींवर उपचार करणारे भारतीय वंशाचे डॉ. नील के. आनंद यांना अमेरिकेत 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोग्य विमा फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. आनंद यांनी रुग्णांना अनावश्यक औषधांच्या बॅग्स देऊन विमा कंपन्यांकडून 2.4 बिलियन डॉलर कमावले होते. याप्रकरणी न्यायालयाने 2 मिलियन डॉलरपेक्षा अधिकची नुकसान भरपाई आणि इतकीच रक्कम जप्त करण्याचे आदेशही दिले.s डॉ. आनंद यांनी रुग्णांना केवळ गरजेची नसलेली औषधेच दिली नाहीत, तर परवाने नसलेल्या इंटर्न्सकडून औषधांची प्रिस्क्रिप्शन लिहून घेतली.

या प्रकरणातील चौकशीपासून आपला बचाव करण्यासाठी त्यांनी 1.2 मिलियन डॉलर इतकी रक्कम एका नातेवाईकाच्या खात्यात वळवली. अमेरिकेवर झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पीडितांवर आपण उपचार केले होते असे दावे डॉ. आनंद यांच्याकडून करण्यात आले. पण न्यायालयाने त्यांचे सगळे युक्तिवाद फेटाळले.

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq?mode=ems_copy_t

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button