
रत्नागिरी निवडणूक विभागाने अनेक अर्ज निकाली काढले
रत्नागिरीत मात्र निवडणूक विभागाचे काम योग्य गतीने सुरु आहे. जानेवारी २०२५ पासून आलेल्या अर्जापैकी बहुतांश अर्ज निकाली झाले आहेत. मतदार यादीत समावेशन, वगळणे, पत्ता बदल अशा विविध कामांसाठी २६ हजार ९३९ अर्ज दाखल झाले. जवळपास सर्व निकाली करण्यात आले. केवळ ०.०१ टक्के एवढेच अर्ज प्रलंबित आहेत. यंत्रणेचा कार्यक्रम वापर होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती निवडणूक उपजिल्हा अधिकारी राहुल गायकवाड यानी दिली.
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारे मतदार यादी विषयक अर्ज स्वीकारले जातात. नमुना क्रमांक ६ द्वारे नवीन मतदारांचा यादीत समावेश व्हावा म्हणून अर्ज घेतला जातो. ६अ हा नमुना अनिवासी भारतीयांच्या मतदार यादीत समावेशनासाठी निश्चित करण्यात आला आहे. नमुना क्रमांक ७द्वारे यादीतील समाविष्ट नाव वगळण्यासाठी अर्ज करता येतो. नमुना क्रमांक ८द्वारे मतदार यादीत तपशील दुरुस्तीसाठी अर्ज दाखल करता येतो. स्थलांतर किंवा ओळखपत्र हरवले असल्यास अशावेळी हा अर्ज दाखल करता येतो.
१ जानेवारी २०२५ पर्यंत आतापर्यंत वरील सर्व प्रकारचे २६ हजार ९३९ अर्ज दाखल झाले. त्यापैकी २२ हजार २५७ अर्ज स्वीकारण्यात आले ४ हजार ६७३ अर्ज फेटाळण्यात आले. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी काम करत असतात. जिल्ह्यातील काम अपेक्षित गतीने हीत आहे. केवळ ०.०१ टक्के एवढेच अर्ज प्रलंबित आहेत असे गायकवाड यांनी सांगितले.www.konkantoday.com




