
रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्याचा जि.प.चा निर्णय
रत्नागिरी जिल्हा परिषदेने विशेष शिक्षकांना न्याय देण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ४२ विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्यात आले आहे. असा निर्णय घेणारी रत्नागिरी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
हा महत्त्वाचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाला आहे. हे समायोजन १५ जुलै २०२५ रोजी पूर्ण झाले आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष शिक्षकांना यासंदर्भातील आदेश व आयडी प्रमाणपत्रे प्रदान केली. या शिक्षकांनी आपला अनुभव आणि कौशल्याचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन लोहार यांनी केले.
www.konkantoday.com




