
मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा येथील तीव्र उतारावर अनेक भीषण अपघात होवूनही ठेकेदाराकडून अपघात रोखण्यासाठी फक्त ’बॅरल’चा उतारा
मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा येथील जीवघेण्या तीव्र उतारावर वारंवार होणार्या अपघातांनंतर ठेकेदार व महामार्ग प्राधिकरण विभागाने आता रस्त्यावर मोठे बॅरल ठेवून त्यांना लाल रंगाच्या रेडियम पट्ट्याही लावल्या आहेत. गंभीर स्वरुपाचे अपघात होऊनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे महामार्गाची सुरक्षा ही केवळ बॅरल भरोसे आहे का? असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून महामार्गावर अपघातांचे सत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. निवळी घाट येथे टँकर उलटून गॅसगळती झाली होती तर अशाच प्रकारची घटना हातखंबा येथे देखील घडली होती. मागील काही दिवसांपासून, हातखंबा शाळेजवळ वारंवार अपघात होत असल्याचे समोर आले होते. यासंबधी ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात आला होता. हातखंबा शाळेजवळ असणार्या होणार्या अपघातासंबंधी पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन ठेकेदार महाभार्ग पालास व प्रशासन यांना सूचना केल्या होत्या. असे असले तरी केवळ बॅरल लावून उपाययोजना केल्याचा दिखावा केला जात असल्याचेच दिसून येत आहे.
www.konkantoday.com




