
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीत टेम्पो अपघातात तरुण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी- भारतवाडीनजीक झालेल्या टेम्पो अपघातात अमर महादेव देवळेकर (४८, रा. शिवतररोड) हा जखमी झाला. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अपघात घडला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तो मालवाहू टेम्पो (एमएच०८/ब्ल्यू ००२१) घेऊन कशेडीच्या दिशेने जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने संरक्षक भिंतीवर आदळून अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. टेम्पोच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com




