
मराठवाड्यातील पुर परिस्थिती ला मदतीचा हात देण्यासाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँडस मधील सर्व सामाजिक संघटना आणि संस्था यांच्या सर्व प्रतिनिधींची शनिवारी जयेश मंगल कार्यालयात बैठक
रत्नागिरी : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार होणारा ढगफुटीमुळे अनेक गावे पाण्याखाली बुडाली आहेत सोलापूर आणि लातूर येथील जनतेचे अनन्वित हाल सुरू आहेत त्यामुळे पुन्हा रत्नागिरीकर एकवटले आहेत यापैकी काही गावांना मदत करण्यासाठी निधी संकलनासाठी शनिवारी येथील जयेश मंगल कार्यालयात हेल्पिंग हँड्स च्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे गावं पाण्यात बुडाली आहेत. सोलापूर व लातूरमधील आपल्या बांधवांकडे खायला, झोपायला, वापरायला काहीच शिल्लक नाही. त्यांच्या आक्रोशाने मन हेलावून जाते.
या बांधवांच्या मदतीसाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँडस मधील सर्व सामाजिक संघटना आणि संस्था पुन्हा एकदा एकवटले आहेत या सर्व प्रतिनिधींची शनिवारी येथील जयेश मंगल कार्यालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीत विविध सामाजिक संघटना विविध व्यावसायिकांच्या संघटना संस्था यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्याचे ठरविण्यात आले तसेच हेल्पिंग हँडस मधील अनेक कार्यकर्त्यांनी “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे या बैठकीतच वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली. सुमारे दोन लाखाचा निधी यावेळी संकलित झाला. आपत्तीग्रस्त गावांना मदत करण्यासाठी रत्नागिरीकरांनी पुन्हा सहकार्यासाठी पुढे यावे, यासाठी हेल्पिंग हँडने मदतीची मोहीम सुरू केली आहे. हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकराना धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता उभारण्यात येणाऱ्या आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी स्वेच्छेने यथाशक्ती मदत करून या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी हेल्पिंग हँड तर्फे करण्यात आले.
या बैठकीला शकील गवाणकर, कौस्तुभ सावंत,सुहास ठाकूरदेसाई, निवृत्त पोलिस अधिकारी शिरीष सासने, राजेश कांबळे, महेश बोराडे, सचिन शिंदे निलेश मलुष्ठे, चेतन नवरंगे, नंदू चव्हाण, राजू भाटलेकर, वल्लभ वणजू, जयंतीलाल जैन, मरीना डिसोजा, जया डावर शोभना कांबळे भूषण बर्वे अमित काटे, महेश गर्दे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.




