
मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची प्रक्रिया गतीने करा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांचे आदेश
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकार्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्यव्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे बोलत होते. मत्स्यव्यवसाय करणार्या शेतकर्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले, अधिकार्यांनी नुकसानग्रस्त मत्स्य शेतकर्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तराव्र सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करताना बाबनिहाय आकडेवारी द्यावी, अशा सूचनाही राणे यांनी दिल्या.www.konkantoday.com




