
चिपळूण तालुक्यातील गुढे येथे गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
चिपळूण तालुक्यातील गुढे येथे गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली. ५५ वर्षीय रवींद्र पांडुरंग आग्रे (गुढे-जोगळेवाडी) यांना दुचाकीवरून जात असताना त्यांना गवा रेड्याने धडक दिली रेड्याच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला . ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजता मोरेवाडी स्मशानभूमीजवळ घडली.
आग्रे हे मार्गतम्हणे बाजारातील डॉक्टरांकडे जात होते, तेव्हाच अचानक गवारेडा समोर आले आणि त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. आग्रे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. रस्त्यावरून जात असलेल्या एका नागरिकाच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आग्रे यांना मृत घोषित केले.
ही घटना विशेषत: धक्कादायक आहे कारण फक्त चार दिवसांपूर्वीच कळंबट परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला घडला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.




