
कोकण रेल्वेमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रवाशाचा मृत्यू
कोकण रेल्वेत एक्स्प्रेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महेश रघुनाथ साळुंखे (५५, रा. अशोकनगर, भांडूप-मुंबई) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी एकच्या सुमारास निदर्शनास आली. साळुंखे हे रेल्वेने सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत असताना ते बेशुद्ध झाले. रेल्वे पोलिसांनी साळुंखे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी साळुंखे यांना तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com




