
कोकणात जाणारे प्रवासी देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत देत आहेत ४० टक्के अधिक भाडे
कोकणात जाणारे प्रवासी देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत समान अंतरावर ४० टक्के अधिक भाडे देत आहेत, अशी गंभीर स्थिती कोकण विकास समितीने उजागर केली आहे. गेल्या ३३ वर्षांपासून लागू असलेला, हा अधिभार प्रवाशांचे आर्थिक नुकसान करत असून, समितीने रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाकडे हा भेदभाव दूर करण्याची मागणी केली आहे.
रेल्वे मंडळाच्या माहितीनुसार, डिसेंबर १९९२ मध्ये प्रथमच प्रवासी वाहतूक अधिभार लागू करण्यात आला. पुढे नोव्हेंबर १९९३ आणि ऑक्टोबर १९९५ मध्ये तो
कायम ठेवण्यात आला. त्यानुसार, १९९२ पासून कोकणात जाणार्या प्रवाशांना इतर मार्गांच्या तुलनेत ४० टक्के अधिक भाडे भरावे लागत आहे.
या अधिभाराला रद्द करण्याची कोणतीही योजना सध्या रेल्वेकडे नाही. भारतीय रेल्वेतील इतर मार्गावर ७०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर देखिल हा अधिभार लागू नाही. त्यामुळे कोकणातील प्रवाशांवर हा अधिभार पूर्णपणे भेदभाव करणारा ठरतो, असे समितीने म्हटले आहे..www.konkantoday.com




