
इंडियन न्यूजपेपर सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक गुप्ता, तर किरण ठाकूर सदस्यपदी
इंडियन न्यूजपेपर सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी वर्ष २०२५-२०२६ साठी ’सन्मार्गी वृत्तसंस्थेचे प्रमुख विवेक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली आहे. या सभेत अध्यक्षांसह इतर पदाधिकार्यांची आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावच्या दै. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. गुप्ता हे मावळते अध्यक्ष एम. व्ही. श्रेयांसकुमार यांचे स्थान घेत आहेतwww.konkantoday.com




