
अफवांमुळे ठेवींमध्ये घट झाली असली तरी राजापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती स्थिर : संजय ओगले
राजापूर अर्बन को-ऑप. बँक ही १०४ वर्षे परंपरा लागलेली अग्रगण्य सहकारी संस्था असून सन २०२४-२५ मध्ये काही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरी गेली आहे. अचानकपणे पसरलेल्या अफवांमुळे काही प्रमाणात ठेवींमध्ये घट झालेली असली तरी बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आहे.
ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केलेली असून नियामक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पारदर्शक व जबाबदार बैंकिंग सेवा सुरु असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बँकेच्या१०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना ओगले म्हणाले, मार्च २०२५ मध्ये बँकेच्या ठेवी ५२३ कोटी इतक्या होत्या. मात्र रत्नागिरी शाखेतील शाखा व्यवस्थापकांकडून काही संशयास्पद व्यवहार झाल्याने बाजारामध्ये बँकेच्या विश्वासार्हतेला थोडाफार तडा गेल्याने बँकेच्या आजअखेर ठेवीमध्ये घट झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जैखापरीक्षकाने बँकेला ड वर्ग लेखापरीक्षा दजी दिला होता. तथापि बँकेने तत्काळ आवश्यक ती सुधारणा करून आणि योग्य ते पुरावे सादर करुन सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडे अपील केले. त्यानुसार सहकार आयुक्तांनी वैधानिक लेखापरीक्षक यांनी दिलेला ड वर्ग बदलून बँकेला व वर्ग दिल्याचे त्यांनी सांगितले.www.konkantoday.com




