
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथे तरुणाची शुल्लक कारणावरून आत्महत्या
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा, येथे जेवण करून घे असा तगादा लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून प्रदीप प्रकाश रजपूत (वय ४०) या तरुणाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीत घडली आहे. ही घटना बुधवार २४/०९/२०२५ रोजी रात्री पावणे एक च्या सुमारास रजपूत यांच्या घर नं. ११६८ मध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रदीप रजपूत हे घरात असताना, त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी आधी जेवण करून घे, त्यानंतर तुला काय करायचे ते कर असे बोलले. या गोष्टीचा राग प्रदीप यांच्या मनात इतका वाढला की त्यांनी रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. प्रदीप रजपूत यांनी घरातील हॉलमधील लाकडी वाशाला फॅन लावण्यासाठी असलेल्या हुकला घरात वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या साडीचा मध्यभाग वापरून गळफास लावला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. त्यावेळी त्यांच्या हृदयाची धडधड अत्यंत कमी जाणवत असल्याने, नातेवाईक, शेजारी आणि पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती प्रदीप रजपूत यांना मृत घोषित केले.




