
पटवर्धन हायस्कूल संघाचा तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजयी झेंडा
रत्नागिरी : तालुकास्तरीय शालेय १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा २४ व २५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या क्रिकेटपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला व विजेतेपद मिळवले.
पहिल्या सामन्यात पटवर्धन हायस्कूलने अ. के. देसाई हायस्कूल मात केली. दुसऱ्या सामन्यात करबुडे हायस्कूलचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम सामना जीजीपीएस हायस्कूल आणि पटवर्धन हायस्कूल यांच्यात रंगला. या चुरशीच्या सामन्यात पटवर्धन हायस्कूलने दमदार खेळ करत विजय मिळवला आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पटवर्धन हायस्कूलच्या खेळाडूंनी दाखविलेल्या जिद्दी खेळाचे सर्वत्र कौतुक झाले. शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शाळेतील शिक्षकवृंद तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




