
ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धेत आबलोलीचा आयुष सुनील दाते रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम
आबलोली ) : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने गुहागर तालुक्यातील भंडारी भवन येथे घेण्यात आलेल्या ज्युडो कराटे स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचलित अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोलीचा विद्यार्थी आयुष सुनील दाते याने १७ वर्षीय ६६ – ७३ वजनी गटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची विभाग स्तरावर निवड झालेली आहे.
विभाग स्तरावर यश मिळवल्यानंतर तो राज्यस्तरावर बक्षीस पात्र होईल. आयुष दाते बरोबरच याच शाळेतील श्रावणी प्रकाश वाघे, फरीना वसीम कुरेशी, मीनाक्षीकुमारी कृष्णकुमार सुंदासा यांनीही विविध वजनी गटात प्रत्येकी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांना ज्युडो कराटे प्रशिक्षक सोनाली वरंडे यांचे मार्गदर्शन लाभले. आयुष दाते याची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या जुडो कराटे स्पर्धेसाठी विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.
चंद्रकला फाउंडेशन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सचिन बाईत, सचिव सौ. स्नेहल बाईत, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कराटे प्रशिक्षिका सोनाली वरंडे आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




