जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने.


दिव्यांगांसाठी विशेष आधार कार्ड शिबिर शनिवारी
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 27/09/2025 रोजी दिव्यांग व्यक्तींचे आधार कार्ड काढण्यासाठी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी येथे, सकाळी 11 ते 4 या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जे दिव्यांग व्यक्ती किंवा बालके अजूनही आधार कार्ड पासून वंचित आहे. त्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहेत. या शिबिराला येतांना खालील कागदपत्रे सोबत आणावीत
👉🏻 18 वर्षाखालील मुलांसाठी 1.QR कोड
असलेला जन्मदाखला.2
दिव्यांग बालकाचे आई किंवा वडिल त्यांच्या आधारकार्डसह स्वतः उपस्थिती असणे आवश्यक.

👉🏻 18 वर्षावरील व्यक्तींसाठी 1.मतदान ओळखपत्र.
तसेच या शिबिरात दिव्यांग व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट करणे,आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे,आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर बदलणे,इत्यादी सेवा उपलब्ध असतील. या करीता स्वतः दिव्यांग व्यक्ती शिबिराच्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे.असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालिका श्रीम. सुरेखा पाथरे यांनी कळविले आहे.

नोट – ज्या दिव्यांग व्यक्तींनी अगोदर आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी कृपया सोबत अगोदरच्या आधार पावत्या आणाव्यात.

अधिक माहितीकरिता संपर्क

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी- 9834440200

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी. 8591903608

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button