आबलोली येथे मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिरास प्रारंभ

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख प्रमोद सीताराम गांधी यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिराला उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मनसेचे उपतालुकाध्यक्ष सचिन गडदे, आबलोली शहराध्यक्ष सुमित पवार, सोशल मीडिया अध्यक्ष प्रीतम सुर्वे यांच्यासह तवसाळचे शाखाध्यक्ष निखिल गडदे, दीपक सुर्वे आदी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत. रक्तदान शिबिरासाठी भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावकर रुग्णालय डेरवण यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरच्या डॉ. सुनीता झुंबरवाड, रवी अग्रवाल, नम्रता आयरे, विद्येश जांगळी, सचिन रानिम, धनश्री चव्हाण, सिद्धू लाड यांची टीम मेहनत घेत आहे. तसेच नेत्र तपासणीसाठी सुरेंद्र ऑप्टिक्स माहिम,
(मुंबई) टीमच्या वतीने डॉ. सुरेंद्र निकम, डॉ. दर्शना जाधव, डॉ. गौरव निकम, निर्मला माडीये, सचिन निकम, अजय डिंगणकर यांची टीम मेहनत घेत आहे.
या शिबिराला आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. या शिबिराला जिल्हा परिषद पडवे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button