
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 निकाल जाहीर मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी मंडळ जिल्हास्तरावर प्रथममंडणगडचे पालघरवाडी द्वितीय तर, राजापूरचे जैतापूरचा राजा तृतीय
रत्नागिरी, दि. 25 ):- पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 या स्पर्धेचा निकाल पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2025 शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये येथील मारुती गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. मंडणगड तालुक्यातील पालघर वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ द्वितीय तर राजापूर तालुक्यातील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
तालुकास्तरावर गुहागर तालुक्यातील श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ, लांजा तालुक्यातील श्री सत्यनारायण उत्साही मंडळ, संगमेश्वर तालुक्यातील युवा गणेश मित्रमंडळ निवे बुद्रुक व खेड तालुक्यातील शिवनेरी नगर मित्रमंडळ या मंडळाना विजेतेपद मिळाले आहे.
जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये तर तालुकास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना प्रत्येकी 25 हजार रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.




