
विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळातर्फे आबलोली-कोष्टेवाडी येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन
येथील विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी दुर्गादेवीचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबलोली बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरील पटांगणात दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गावात भक्तीमय वातावरण आहे.
यानिमित्ताने दहा दिवस दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव विविध, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जाणार आहे. नवरात्रौत्सवात देवीची आरती, भजनाचे कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा, दांडिया रास, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि हळदी-कुंकू कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांच्या आणि तरुणाईच्या आनंदाला उधाण आले आहे.
विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णकांत रेपाळ, उपाध्यक्ष रवींद्र रेपाळ, सचिव अजित रेपाळ, खजिनदार प्रशांत नेटके, सदस्य नरेश निमुणकर, प्रथमेश निमुणकर, नितेश निमुणकर, रुशिल निमुणकर, योगेश रेपाळ, स्वप्नील रेपाळ, अतिश रेपाळ, शरद उकार्डे, शरद लांडे, राजेश तोडकरी, धनराज गुरसळे, नकुल भंडारी, वैभव नेटके, सत्यम गुरसळे, प्रसाद नेटके, विशाल लोकरे, विशाल नेटके, अक्षय निमुणकर, गणेश महाडिक, शैलेश दिंडे, ऋषिकेश बाईत, सुरज रेडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते नवरात्रौत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.




