
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे
बिनविरोध निवडणूक : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची महत्त्वाची भूमिका
रत्नागिरी : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वे बिनविरोध निवडून आले आहेत. या समितीचा कार्यकाळ २७ जून २०२३ ते २६ जून २०२८ असा आहे.
यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याने आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीप सुर्वे यांना त्यांचे भक्कम पाठबळ होते. कृषी उत्पन्न बाजार समिती हे महत्त्वाचे केंद्र असून येथे भाजपच्या सदस्य सभापती झाल्याने भाजपमध्ये उत्साह पसरला आहे.
बाजार समितीच्या संचालकांमध्ये सभापती संदीप हनुमंत सुर्वे यांच्यासह सुरेश भिकाजी सावंत, स्नेहल सचिन बाईत, गजानन कमलाकर पाटील, अरविंद गोविंद आंब्रे, मधुकर दिनकर दळवी, सुरेश मारुती कांबळे, हेमचंद्र यशवंत माने, श्रीमती स्मिता अनिल दळवी, विजय वासुदेव टाकले, नैनेश एकनाथ नारकर, रोहित दिलीप मयेकर, ओंकार संजय कोलते, प्रशांत यशवंत शिंदे, पांडुरंग जयराम कदम यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे पदसिद्ध सदस्य आहेत.
या निवडीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




