
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन यांनी बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. नवरात्रौत्सव काळात देवीचे दर्शन घेण्याचा योग आला, याचे समाधान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी त्यांनी अंबाबाईला साडी ओटी अर्पण केली, तसेच कोल्हापुरी दागिन्यांची खरेदी केली.
अभिनेत्री रविना टंडन या एका खासगी कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आल्या होत्या. दुपारी दोन वाजता त्यांचे अंबाबाई मंदिरात आगमन झाले. त्यांच्यासोबत उद्योगपती संजय घोडावत उपस्थित होते. लाल रंगाच्या डिझायनर चोली व प्लाझो घातलेल्या रविना टंडन यांनी देवीला साडी ओटी अर्पण केली. अंबाबाईच्या धार्मिक विधींची माहिती घेतली.
कोल्हापूरला येऊन अंबाबाई दर्शनाचा योग यावा, याची वाट बघत होते. नवरात्रौत्सवात देवीचे दर्शन झाले, याचे समाधान असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी परिसरातील दुकानांमध्ये कोल्हापुरी दागिन्यांची खरेदी केली. अंबाबाईच्या काचेतील प्रतिमा घेतल्या.




