
बुद्धविहाराच्या लढ्याला गोल्डमॅन म्हणून परिचित रोहित पिसाळांचा पाठिंबा
आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक व गळ्यामध्ये एक किलो सोन्याची बुद्धमूर्ती असल्याने गोल्डमॅन म्हणून परिचित रोहित पिसाळ यांनी सोमवारी थिबा राजवाडा व थिबा कालीन बुद्धविहार परिसराला भेट दिली. यावेळी पिसाळ यांनी थिबा राजवाड्याची झालेल्या दूरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. तर थिबा कालीन बुद्धविहाराबाबत संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. पिसाळ हे तरुणांना रोजगारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी प्रथमच रत्नागिरीत आले होते.
रत्नागिरीत आगमन होताच पिसाळ यांनी जिल्हा रुग्णालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हॉल येथे तरुणांना मार्गदर्शन केले.
यानंतर पिसाळ यांनी थिबा कालीन बुद्धविहार परिसराला भेट दिली. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पिसाळ म्हणाले की, स्थानिक प्रश्न आणि वारसा संवर्धनासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com




